हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Municipal Elections Date । राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत मागच्या काही दिवसापासून चर्चा सुरु आहेत. जवळपास सर्वच महापालिकेत मागच्या २०३ वर्षांपासून प्रशासक असल्याने अनेक कामे मार्गी लावण्यात अडथळे येत आहेत. अशावेळी सर्वच राजकीय पक्ष निवडणूका कधी जाहीर होणार याकडे डोळे लावून बसले होते. अखेर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. त्यानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका दिवाळीनंतर म्हणजेच डिसेंबर-जानेवारीमध्ये होणार आहेत.
आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आढावा बैठक पार पडली. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे (Dinesh Waghmare) यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीविषयी माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, मनपा, जिल्हा परिषद आणि नगरपालिका अशा सर्व निवडणुका टप्पाटप्प्याने होणार आहेत असं दिनेश वाघमारे यांनी म्हंटल. कारण सर्व निवडणुका एकत्रित करण्यासाठी तेवढं मनुष्यबळ राज्य निवडणूक आयोगाकडे नाही. पण तरीही पहिली कोणती निवडणूक घेतली जाईल ते अद्याप निश्चित नाही, अशी महिती दिनेश वाघमारे यांनी दिली.
आरक्षण कस असेल- Municipal Elections Date
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाबाबत माहिती देताना दिनेश वाघमारे म्हणाले की, SC-ST आरक्षण निश्चित असते, परंतु OBC आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लॉटरी पद्धत अवलंबली जाणार आहे ओबीसी आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आमचे काम थोडे सोपे झाले आहे असं त्यांनी म्हंटल. तसेच या निवडणुकांमध्ये VV-PAT यंत्रे वापरण्यात येणार नाहीत, कारण एकापेक्षा जास्त प्रभाग पद्धत असते. त्यामुळे एका पेक्षा जास्त उमेदवार निवडून द्यायचे असतात. तसेच त्यांची मतमोजणी करायची असते. त्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर यंदाच्या निवडणुकीत होणार नाही असं वाघमारे यांनी स्पष्ट केलं .




