महापालिकेचा निष्काळजीपणा ट्रकचालकाला भोवला; दुभाजकाला धडकून ट्रक उलटला…

औरंगाबाद | सिल्लोडहून पुण्याला मका घेऊन जाणारा ट्रक गुरुवारी (ता.२५) पहाटे दीड वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील जळगाव रस्त्यावरील चौकातील वोक्खार्ड दुभाजकाला धडकला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे व मकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे एका बाजूने जाणाऱ्या रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

महापालिकेतर्फे या चौकात पोलचे काम करण्यात येत आहे. यासाठी रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला. या मुरमावरून हा ट्रक घसरत दुभाजकाला धडकला असल्याचे ट्रकचे चालक अरुण दहिफळे यांनी सांगितले.

दहिफळे हे गेल्या बारा वर्षांपासून घोडेगाव (ता. नेवासा, जि. नगर) येथे मका खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. नेहमीप्रमाणे ते सिल्लोड येथील बाजार समितीतून मका घेऊन पुण्याकडे निघाले होते.
दरम्यान दीड वाजेच्या सुमारास जळगाव रस्त्यावरील वोखार्ड चौकात आल्यानंतर ट्रक हा महापालिकेने टाकलेल्या मुरमावरून ट्रक घसरत दुभाजकाला भिडला.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like