कराडात खून : बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीचा गळा आवळून दगडाने ठेचून हत्या

कराड, ः येथील वाखाण परिसरात राहत असलेल्या मजूराचा त्याच्याच मेव्हण्याने बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणावरून गळा दाबून त्याच्या छातीवर दगडाने ठेचून करून खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

नितीन नागेश भालशंकर रा. वाखान परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी रवि रमेश कुडवे रा. वाखाण परिसर, मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर असे खूनप्रकरणी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील वाखाण परिसरात नितीन भालशंकर हा आपल्या कुटुंबासमवेत राहत होता. तो दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करायचा याच कारणावरून चिडून जाऊन नितीनच्या मेव्हण्याने दाजीचा गळा दाबून त्यानंतर त्याच्या छातीवर दगडाने ठेचून खून केला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.