पीपीई किट घातलेल्या नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वडोदरा । कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. याच दरम्यान एक भयंकर घटना समोर आली आहे. गुजरातच्या वडोदरामध्ये पीपीई किट घातलेल्या एका नर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. वडोदरातील गोत्री परिसरातील वैकुंठ सोसायटीजवळ तिचा मृतदेह सापडला होता.

पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता खळबळजनक माहिती आता समोर आली आली. धक्कादायक बाब म्हणजे नर्सच्या पतीनेच तिची हत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. पोलिसांनी माहितीनुसार, शिल्पा पटेल 39 वर्षीय मृत नर्सचं नाव आहे. वडोदरातील एका रुग्णालयात त्या नोकरी करत होत्या. गोत्री परिसरात त्यांचा मृतदेह सापडला होता.

कामावर जात असताना पतीने त्यांची हत्या केली आणि रस्त्यात तिचा मृतदेह ठेवून तो फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता त्यांना नर्सच्या पतीवर संशय आला. त्यावेळी त्यांनी अधिक तपास केला असता पतीने हत्या केल्याची कबुली दिली. गेल्या वर्षभरापासून या पती-पत्नीत वाद होत होते. तसेच शिल्पा यांनी देखील पतीला आत्महत्येची धमकी दिली होती अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. सतत वाद होत असल्याने रागाच्या भरात आरोपीने अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी नर्सच्या पतीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment