कराड | कराड शहरातील वाखान परिसरात 32 वर्षे महीलेचा खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. उज्वला ठाणेकर (वय-32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच वाखाण रोड परिसरात खळबळ उडाली.
घटनास्थळी पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.
या घटनेची अधिकचा तपास पोलिस करत असून या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे. दरम्यान, सातारा गुन्हे शाखेचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते.