मित्र म्हणून घरी बोलावले, पण ‘तो’ पत्नीच्या प्रेमात पडला आणि….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नवी मुंबईतील रबाळे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने आपल्याच मित्राची हत्या केली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीला मोठ्या शिताफीने अटक केली आहे. मृत व्यक्ती आणि आरोपी दोघेही रबाळे इथं एकाच ठिकाणी कामाला होते. यामुळे दोघांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे होते. याच दरम्यान आरोपीचे मृत मित्राच्या पत्नीवर प्रेम जडले. त्यामुळे आरोपीने प्रेमात अडथळा येत असल्यामुळे आपल्याच मित्राचा काटा काढला अशी माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे.

19 जून रोजी मृत तरुणाच्या पत्नीने पोलिसांत पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर मृत तरुणाच्या भाऊ सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने माहिती दिली की, रबाळे इथं एका दुकानाबाहेर भावाची चप्पल आढळून आली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दुकानाचे शटर उघडले असता बाथरूमध्ये मृतदेह आढळून आला.

यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. त्यांनी मृत तरुणासोबत काम करत असणाऱ्या तरुणांची माहिती गोळा केली. त्यावरून एक संशयित आरोपी हा उत्तर प्रदेश इथं राहणार होता. तो बेपत्ता असल्याचे समोर आलं. तसेच तो बंगाली भाषेत बोलत असल्याची माहिती काही जणांनी दिली. यावरून पोलिसांचा त्या आरोपीवर संशय बळावला आणि त्यानंतर पोलिसांनी एक टीम पश्चिम बंगालमध्ये पाठवली. तिकडे पोहोचल्यावर पोलिसांना समजले कि आरोपी पुन्हा मुंबईला जात आहे. त्यानंतर पोलिसांनी बंगालहून आरोपीचा पाठलाग सुरु केला. यानंतर त्याला इगतपुरी रेल्वे स्टेशनवर अटक करण्यात आली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपींने खूनाची कबुली दिली. या प्रकरणाचा पुढील तपास नवी मुंबई पोलिस करत आहेत.

Leave a Comment