औरंगाबाद | 35 ते 40 वयोगटातील तरुणांच्या डोक्यावर वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी जाधववाडी मध्ये समोर आली.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दुपारपर्यंत मृताची ओळख पटली न्हवती. पोलिसांकडून तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.
पहाटे सिडको पोलीस ठाण्यातील पोलीस गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, जाधववाडी मध्ये एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनस्थळी गाठले.तेथे पोहोचल्यावर तरुण मृत झाल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील घटनस्थळ गाठले.असता तेथे रक्ताच्या थारोळ्यात एक 35 ते40 वयोगटातील तरुण ओट्यावर पडलेला होता.तर मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करून मृतदेहाची पाहणी केली आता.मृताच्या खिशात ओळख पटेल असे काहीही आढळून आले नाही.पोलिसांनी आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून मृताची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न केले मात्र दुपारपर्यंत ओळख पटली न्हवती. उत्तरीय तपासणी साठी घाटी रुग्णालयात हलविले आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पुढील तपास निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत.
लुटमारीच्या उद्देशाने हत्या?
स्पर्धा परीक्षेसाठी औरंगाबादेत आलेल्या दिव्यांग तरुणांची गेल्या महिन्यात बसस्थानक परिसरातून आणून मनपा जवळील स्मशानभूमीत लुटमारीच्या उद्देशाने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेला महिना उलटत नाही तर आज पुन्हा त्या घटनेसारखीच खुनाची घटना पुन्हा घडली आहे. ही हत्या कोणत्या कारणाने झाली? कोणी केली? हा मृत तरुण कोण आहे? तो कुठला आहे? ही सर्व माहिती अजून अज्ञात आहे. पोलिसांसमोर मृताची ओळख पटविण्याचे आव्हान आहे. या हत्येमधील देखील घटस्थळवरून सिडको बसस्थानक काही अंतरावरच आहे. शिवाय मृताचे बोट तोडले असल्याचे जाणवत असल्याने मृत्यू पूर्वी तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असावा, हा तरुण दुसऱ्या तालुक्यातील, जिल्ह्यातील असू शकतो अशी देखील शक्यता आहे. ही हत्या देखील लुटमारीच्या उद्देशाने तर झाली नाही ना? अशी देखील शक्यता नाकारता येत नाही.
संचारबंदीत हत्या, गोळीबार. चोरी….
सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. शहरात पन्नास पेक्षा अधिक ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आहे असा दावा शहर पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. असे असताना देखील गेल्या महिन्यात पडेगाव भागात हॉटेल वर गोळीबार करण्यात आला,तर तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली होती.या घटना ताज्या असताना आज पुन्हा संचारबंदीत एका तरुणाची भोसकून हत्या करण्यात आली आहे.त्या मुळे रात्रीची संचारबंदी आणि पोलिसांच्या रात्रगस्ती वर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.