कोरेगाव मनसेच्या माजी तालुका अध्यक्षाचा खून

सातारा प्रतिनिधी  शुभम बोडके

कोरेगाव तालुक्यात मध्यरात्री एका 30 वर्षीय युवकाचा खून करण्यात आला. जांभ- त्रिपुटी या गावाजवळील जळगाव येथील मनसेचा माजी कोरेगाव तालुका प्रमुख वैभव ढाणे याचा निर्घृण खून करण्यात आला. युवकांवर धारधार शस्त्राने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोरेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जळगाव गावात एका मंदिराच्या आवारात खून करण्यात आला. या घटनेमुळे कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली. वैभव यांच्यासोबत असलेल्या जुन्या भांडणाच्या कारणातून खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच वैभव ढाणे यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले आहे. खूनाच्या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. तर जळगाव येथे तणावाचे वातावरण पहायला मिळत आहे.