धक्कादायक ! डोक्यात फरशी घालत जावयाने केला सासूचा खून; चाकूनेही केले वार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जालना – पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून जावयाने सासूच्या डोक्यात फरशी घालून व चाकूने वार करून खून केला. ही धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री जालना शहरातील प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर भागात घडली. सखुबाई बिरजूलाल काळे (75, रा. मार्बल पॅलेस, प्रियदर्शनी कॉलनी, संभाजीनगर, जालना) असे मयत महिलेचे नाव आहे.

या प्रकरणात मयत महिलेची मुलगी ज्योती विजय धिल्लोड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शहरातील संग्रामनगर बसस्थानक भागात राहणाऱ्या ज्याेती धिल्लोड या सोमवारी कामावर गेल्या होत्या. रात्री त्या घरी गेल्या असता त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. मुलांकडे विचारणा केल्यानंतर मुलांनी वडील विजय किशन धिल्लोड (रा. भीमनगर भावसिंगपुरा, औरंगाबाद) यांनी सखुबाई काळे यांना फरशी, चाकूने मारहाण केल्याचे सांगितले. विजय धिल्लोड याने पत्नी, मुलांना सोबत पाठवित नसल्याचा राग मनात धरून सखुबाई काळे यांचा खून केल्याची तक्रार ज्योती धिल्लाेड यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि. रमेश रूपेकर हे तपास करीत आहेत.

जावई गजाआड –
घटनेची माहिती मिळताच सदरबाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. घटनेनंतर फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या विजय धिल्लोड याला गांधीचमन भागातून अटक केली. मंगळवारी न्यायालयात हजार केले असता त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोउपनि रमेश रूपेकर यांनी सांगितले.

Leave a Comment