Sunday, March 26, 2023

डोंगरगाव येथे शेतीच्या वादातून एकाच खून; 4 जणांवर गुन्हा दाखल

- Advertisement -

कासारशिरसी : हॅलो महाराष्ट्र – निलंगा तालुक्यातील डोंगरगाव या ठिकाणी जमिनीच्या वादातून एका ६० वर्षीय शेतकऱ्याची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

मृत झालेल्या व्यक्तीचे नाव सुभाष धोंडिबा बिराजदार असे आहे. बुधवारी सकाळी ८ वा.च्या सुमारास डोंगरगाव येथील आरोपी सचिन बिराजदार, सदाशिव बिराजदार, वामन बिराजदार, स्वप्निल बिराजदार या चौघांनी संगनमत करून जमिनीच्या वादातून काट्या- लोखंडी सळई, दगडाने सुभाष धोंडिबा बिराजदार यांना मारले. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या प्रकरणी मृत व्यक्तीचा मुलगा रुक्मांगध बिराजदार यांच्या फिर्यादीवरून कासारशिरसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कोल्हे, एपीआय रेवनाथ ढमाले यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक जण अजून फरार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे करत आहेत.