Tuesday, January 31, 2023

धक्कादायक ! बहिणीला त्रास देणाऱ्या नवऱ्याची मेहुण्याने केली हत्या

- Advertisement -

भंडारा : हॅलो महाराष्ट्र – भंडाऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीला त्रास देणाऱ्या जावयाचा मेहुण्याने धारदार शस्त्राने खून केला आहे. हि घटना शुक्रवारी मध्यरात्री कस्तुरबा वार्डामध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण
मृत व्यक्तीचे नाव मंगल अमर मोगरे असे आहे. तर आरोपी मेहुण्याचे नाव सुशील संजू संदेश असे आहे. मंगल हा आपल्या पत्नीला नेहमी मारहाण करुन त्रास देत होता. पत्नीने हे सगळे भाऊ सुशील याला सांगितले. यानंतर सुशीलने अनेकदा मंगलची समजूत काढली. पण त्याने त्रास देणे सुरूच ठेवले. शुक्रवारी रात्री मंगल घरी एकटा असताना सुशील त्याच्या घरी गेला त्यानंतर मंगलला काही कळायच्या आत सुशीलने त्याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला.

- Advertisement -

या प्रकरणाची माहिती शेजारच्यांना समजताच त्यांनी मंगलला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेची माहिती भंडारा पोलिसांना समजताच ते घटनास्थळी दाखल झाले. पण तोपर्यंत आरोपी तिकडून पसार झाला होता. यानंतर पोलिसांनी शनिवारी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.