हिजाब परिधान करून मुस्लिम महिलांनी साजरी केली शिवजयंती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या मिरज शहरामध्ये शिवजयंती निमित्त असंख्य मुस्लिम महिलांनी हिजाब परिधान करून मोठ्या उत्साहात मध्ये शिवजयंती साजरी केली. यावेळेस सामाजिक कार्यकर्त्या सुमय्या वसीम रोहिले. त्याच बरोबर प्रभाग पाच मधील भाजपामधून निवडणूक लढवलेले महिला उमेदवार आफ्रीन निसार रोहिले . आणि शहनाज मुल्ला. तबस्सुम रोहिले, नजो शिलेदार परिसरातील आणि सर्वच महिला कार्यकर्त्या हे त्या ठिकाणी उपस्थित होते.

सौ सुमय्या रोहिले म्हणाल्या,”छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना मानसन्मान आणि आदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हिंदू-मुस्लीम हा भेद कधीच नव्हता. त्याचबरोबर कर्नाटकात बहुचर्चित असलेल्या या प्रकरणावर ती टिपणी करत देशाच्या विकासासाठी असलेली कृत्य देशाच्या देशाच्या हितासाठी चांगले नाही.” आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आम्हाला त्याचा स्वार्थ अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या.

Leave a Comment