Property Tips| एखादे घर, फ्लॅट किंवा दुकान खरेदी करण्याचे स्वप्न अनेकजण पाहत असतात. खरे तर अशी कोणतीही मालमत्ता खरेदी करणे अत्यंत जोखमीचे काम असते. कारण की, मालमत्ता खरेदी करत असताना कागदपत्रांसह इतर सर्वच बाबींची तपासणी करावी लागते. खरेदी करायला तहसीलदार ऑफिसमध्ये नोंदणी करून मोकळे होऊन चालत नाही. पुढे त्या खरेदीदाराला इतर प्रक्रिया ही पूर्ण करावी लागते. महत्त्वाचे म्हणजे, रजिस्ट्रेशन केल्यानंतर म्यूटेशन करणे आवश्यक असते. हे म्यूटेशन काय असते? ते कसे केले जाते? याबाबत वाचा. (Property Tips)
म्यूटेशन करून घ्या (Mutation of Property)
एखाद्या व्यक्तीने मालमत्ता खरेदी केली आणि मालमत्तेची नोंदणी केली तरी त्या व्यक्तीला मालमत्तेचे मालकी हक्क मिळत नाहीत. त्याकरिता म्यूटेशन करावे लागते. म्यूटेशन न केल्यामुळे मालमत्तेसंदर्भात वाद निर्माण होई शकतो. भारतीय नोंदणी कायद्यानुसार, कोणत्याही मालमत्तेचे खरेदी केल्यानंतर त्यांचे लिखित नोंदणीही करावी लागते. ही नोंदणी उपनिबंधक कार्यालयात केली जाते. परंतु फक्त ही नोंदणी केल्यामुळे मालमत्तेचा मालकी हक्क प्राप्त होत नाही. त्यासाठी म्यूटेशन करावे लागते.
कोणत्याही मालमत्तेची ही नोंदणी झाल्यानंतर या नोंदणीच्या आधारे म्यूटेशन केल्यानंतरच मालमत्तेवर हक्क दाखवता येतो.(Property Tips) हे म्यूटेशन केल्यामुळे मालमत्तेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे येतात. महत्वाचे म्हणजे नोंदणी नंतर जेव्हा दाखल खारीज होते तेव्हाच मालमत्तेचे हक्क खरेदीदाराकडे येतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सरकारी रेकॉर्डमध्ये तुमचे नाव समाविष्ट करण्यात येते. तसेच जुन्या मालकाचे नाव त्या मालमत्तेवरून काढले जाते. ही प्रक्रिया करणे प्रत्येक खरेदी दारासाठी आवश्यक आहे. अन्यथा पुढे जाऊन जुना मालक पुन्हा मालमत्तेवर हक्क दाखवू शकतो.