Mutual Fund | आजकाल अनेक लोक हे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असतातm कारण म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात रिटर्न्स मिळतात. त्यामुळे यात गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींची संख्या देखील वाढत चाललेली आहे. म्युच्युअल फंडने 2024- 25 या वर्षांमध्ये पहिल्या दोन महिन्यातच 81 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांचे अकाउंट जोडलेले आहेत. आणि याचे मुख्य कारण म्हणजे मार्केटिंग सतत वाढत आहे. त्याचप्रमाणे सेलिब्रिटींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडचे प्रमोशन होत आहेत.
त्याचप्रमाणे नेटवर्किंग देखील जास्त होत आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडचे (Mutual Fund ) ग्राहक देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आता स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म ट्रेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिवेश डी यांनी मुदत ठेवी बद्दलची बदलती धारणा आणि वाढते उत्पन्न पातळी तसेच म्युच्युअल फंड बाजारपेठातील वाढती गुंतवणूक याबद्दलची संख्या सांगितली आहे. एफडी योजना ही म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त उत्पन्न देत नाही हे देखील त्यांनी स्पष्ट केले आहेत.
ते म्हणाले की, म्युच्युअल फंडाचा दृष्टीकोन मजबूत आहे, ज्याला शेअर बाजारातील चालू तेजी, ठोस जोखीम व्यवस्थापन पद्धती, गुंतवणूकदारांना सतत उपलब्ध असलेली माहिती आणि सतत मार्केटिंगचे प्रयत्न यामुळे पाठिंबा मिळतो. तसेच यात नेहमीच चांगली वाढ होत राहील कारण लोक त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी संपत्ती निर्मितीसाठी पर्यायी मार्ग शोधतात, असे तज्ञांनी सांगितले.
मे अखेरीस म्युच्युअल फंड फोलिओची संख्या किती ? | Mutual Fund
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या मे अखेरीस उद्योगातील म्युच्युअल फंड फोलिओची संख्या 18.6 कोटी होती. मार्चअखेर नोंदवलेल्या १७.७८ कोटींपेक्षा हे प्रमाण ४.६ टक्के किंवा ८१ लाख अधिक आहे. फोलिओ हा वैयक्तिक गुंतवणूकदाराच्या खात्याला दिलेला क्रमांक आहे. गुंतवणूकदाराला अनेक फोलिओ असू शकतात.
एकूण 81 लाख फोलिओपैकी, इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांमध्ये एप्रिल-मे दरम्यान 61.25 लाख युनिट्सची भर पडली. यासह, अशा फोलिओची संख्या 12.89 कोटींवर पोहोचली आहे. हे एकूण फोलिओच्या ६९ टक्के आहे. मे महिन्यात म्युच्युअल फंड उद्योगात 45 लाख फोलिओ जोडले गेले, तर एप्रिलमध्ये 36.11 लाख फोलिओ जोडले गेले. 2023 मध्ये मासिक आधारावर फोलिओमध्ये सरासरी जोडणी 22.3 लाख होती.