Mutual Fund | आज-काल अनेक लोक म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. जर तुम्ही देखील फंडात गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता म्युचुअल फंडात केवायसी अपडेट करणे खूप गरजेचे आहे. त्यावेळी ऍड्रेस प्रूफ म्हणून देखील जमा केले होते. परंतु आता पोर्टफोलिओ 12 अंकी डिजिटल नॅशनल आयडेंटिटी नंबर जोडला नसेल म्हणजेच आधार नंबर जोडला नसेल, तर त्यांना नवीन एमएस युनिट खरेदी करता येणार नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांना आता 2024-25 पासून जर म्युच्युअल फंडात खरेदी करायची असेल, तर त्यांना आधारद्वारे केवायसी करणे गरजेचे असणार आहे. अन्यथा त्यांना गुंतवणूक करता येणार नाही. (Mutual Fund)
सेबीने केवायसीबाबत घालून दिलेले हे नवीन नियम आता म्युच्युअल फंडासाठी 1 एप्रिल पासून लागू झाले आहेत. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक आणि रिडंप्शन सुरू ठेवण्यासाठी स्टेटसची माहिती तपासणं आवश्यक आहे.
केवायसी स्टेटस तपासा | Mutual Fund
गुंतवणूकदार त्यांचे केवायसी स्टेटस तपासण्यासाठी सीएएमएस ,कार्वी, सीव्हीएल आणि एनडीएमएल यांसारख्या वेबसाईटवर लॉगिन करू शकतात. त्यामुळे तुमचे केवायसी स्टेटस होल्डर वैद्य आहे की नाही हे स्पष्ट होईल
केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
- आधार कार्ड
- पासपोर्ट
- ड्रायव्हिंग लायसन
- मतदान ओळखपत्र
- मनरेगा तर्फे देण्यात आलेले जॉब कार्ड
- पत्त्याचा पुरावा
- केंद्र सरकारने अनुसूचित केलेले इतर कोणतेही दस्ताऐवज.