थर्ड अंपायरचा निर्णय अमान्य ?? फलंदाजाने DRS वरच घेतला DRS !!! आयपीएल मध्ये घडली आगळीवेगळी गोष्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएलमध्ये कालच्या किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs KXIP) यांच्यातील सामन्यात एक विचित्र घटना घडली. हैदराबादचा गोलंदाज खलील अहमद गोलंदाजी करत असताना पंजाबचा फलंदाज मुझीब रेहमानचा झेल बेअरस्टोनं घेतला. मात्र अपील केल्यानंतर पंचांनी नाट आऊट असल्याचे सांगितले. यावर हैदराबादला DRS घेण्याची संधी होती, मात्र त्यांनी घेतला नाही.

अखेर पंचांनी सॉफ्ट सिग्नल नॉट आऊट देऊन थर्ड अम्पायरची मदत मागितली. यात मुझीबची बॅट चेंडूला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे थर्ड अम्पायरनं मुझीबला बाद घोषित केले. मात्र मुझीब बाद झाल्यानंतर त्यानं निर्णय अमान्य असल्याचे सांगत थर्ड अम्पायरच्या निर्णयावरच DRS घेतला. त्यामुळे एका निर्णयासाठी दोन वेळा DRS घेण्यात आला.

मुझीबनं DRS घेतल्यानंतर थर्ड अम्पायरनं अल्ट्रा एजमध्ये बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला आहे की नाही हे पाहिले. यातही चेंडू आणि बॅट यांचा संपर्क झाल्याचे दिसून आले. त्यानंतर मुझीबला पुन्हा बाद घोषित करण्यात आले. अखेर मुझिब ला बाहेर जावंच लागले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment