MVA Expected Candidates List : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्यावर आली असून त्यादृष्टीने राज्यातील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) बैठकांचे सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यातच आता लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागांसाठी महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे. यावेळी अनेक नव्या चेहऱ्याना लोकसभेसाठी उतरवण्यात येणार आहे. खास गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. असं झाल्यास राज्यातील हि सर्वात हाय वोल्टेज लढत होईल.
बुधवारी मुंबईतील ट्रायडेंट हाॅटेलमध्ये महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भातली बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघाच्या जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटल होते कि जागावाटपाची घोषणा आम्ही थेट पत्रकार परिषदेमध्येच करु असं म्हटलं होतं. मात्र आता संभाव्य उमेदवारांची यादी (MVA Expected Candidates List) समोर आली आहे. त्यानुसार कोणता मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाला सोडण्यात आला आहे? तसेच त्याठिकाणी उमेदवार कोण असतील हे आज आपण पाहूया…
पहा संभाव्य उमेदवारांची यादी – MVA Expected Candidates List
मुंबई उत्तर पश्चिम – अमोल कीर्तीकर, शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण – अरविंद सावंत, शिवसेना ठाकरे गट
मुंबई ईशान्य – संजय दिना पाटील, शिवसेना ठाकरे गट
मुंबई दक्षिण मध्य – अनिल देसाई, शिवसेना ठाकरे
मुंबई उत्तर मध्य – काँग्रेस (अजून ठरलं नाही)
मुंबई उत्तर – काँग्रेस (अजून ठरलं नाही)
कल्याण – आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे, शिवसेना ठाकरे गट
ठाणे – राजन विचारे, शिवसेना ठाकरे गट
संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, शिवसेना ठाकरे गट
धाराशिव – ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट
नाशिक – विजय करंजकर, शिवसेना ठाकरे गट
पालघर – भारती कामडी, शिवसेना ठाकरे गट
जालना – शिवाजीराव चोथे शिवसेना ठाकरे गट
अकोला – प्रकाश आंबडेकर, वंचित बहुजन
परभणी – संजय जाधव शिवसेना ठाकरे गट
नांदेड – आशा शिंदे काँग्रेस
लातूर – अजून नाव ठारलं नाही काँग्रेस
रामटेक – रश्मी बर्वे, कुणाल राऊत, किशोर गजभिये, तक्षशिला वागधरे काँग्रेस
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर, शिवसेना ठाकरे गट
यवतमाळ वाशीम – संजय देशमुख, शिवसेना ठाकरे गट
हिंगोली – सचिन नाईक, काँग्रेस
अमरावती – बळवंत वानखेडे आणि राहुल गडपाले काँग्रेस
भंडारा – नाना पटोले काँग्रेस
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार काँग्रेस
गडचिरोली – डॉ. नामदेव उसेंडी,डॉ. नामदेव किरसान आणि डॉ. नितीन कोडवते काँग्रेस
धुळे – तुषार शेवाळे आणि शामकांत सनेर काँग्रेस
नंदुरबार – के सी पाडवी काँग्रेस
भिवंडी – दयानंद चोरघे काँग्रेस
वर्धा – हर्षवर्धन देशमुख आणि समीर देशमुख काँग्रेस
नागपूर – अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, प्रफुल गुडधे काँग्रेस
रायगड – अनंत गीते, शिवसेना ठाकरे गट
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत, शिवसना ठाकरे गट
मावळ – संजोग वाघेरे, शिवसेना ठाकरे गट
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना ठाकरे गट
शिरूर – अमोल कोल्हे, राष्ट्रवादी
सातारा – श्रीनिवास पाटील किंवा त्यांचे सुपुत्र सारंग पाटील, राष्ट्रवादी
माढा – लक्ष्मण हाके (सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आहे मात्र राष्ट्रवादी चिन्हावर लढण्याची शक्यता )
बारामती – सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी
जळगाव – हर्षल माने, शिवसेना
रावेर – एकनाथ खडसे, राष्ट्रवादी
दिंडोरी – चिंतामण गावित, राष्ट्रवादी
बीड – नरेंद्र काळे, राष्ट्रवादी
अहमदनगर – निलेश लंके, राष्ट्रवादी
पुणे – रविंद्र धनगेकर काँग्रेस
सोलापूर – प्रणिती शिंदे, काँग्रेस
सांगली – विशाल पाटील, काँग्रेस
कोल्हापूर – शिवसेना ठाकरे गट ( मात्र ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते )
हातकणंगले – शिवसेना ठाकरे गट ( खरं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडली आहे मात्र अद्याप स्वाभिमानीने महविकास आघाडीत येण्याची तयारी न दाखवलेली नाही )