Friday, January 27, 2023

महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती- संजय राऊत

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकारला काहीही केलं तरी तडा जाणार नसून महाविकास आघाडीचे स्टेअरिंग ठाकरेंच्याच हाती आहे आणि राहील असे मोठं विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. संजय राऊत हे सध्या गोव्यात असून त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

गोव्यात आमचा प्रचार आणि प्रसार, विस्तार सुरु आहे. इतक्या वरचं आम्ही थांबणार नाही… तर विधानसभा निवडणुकीनंतर गोव्यामध्ये लोकसभेची तयारी आम्ही सुरु करणार आहोत. गोव्यात लोकसभेच्या जागा लढणार तयारी सुरु करणार आहोत, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना गोव्यात 11 जागा लढतेय पेंडण्यापासून ते वास्कोपर्यंत गोव्याच्या दोन्ही बाजूला शिवसेनेचे उमेदवार आहेत. ख्रिश्चन, हिंदू, मराठी, सर्व म्हणजे अख्खा गोवा आमचा आहे असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत 22 जागा निवडूण येण्याच्या केलेल्या विधानावर प्रतिउत्तर देत राऊत म्हणाले की, “22 जागा ना… जिंकू द्याना.. ते नेते आहेत त्यांच्या पक्षाचे आणि नेत्याला असं आत्मविश्वास पूर्ण बोलणं आवश्यक असतं. आम्हीही बोलतो 11 पैकी 11 जागा जिंकू. काँग्रेस बोलतं आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल. आप म्हणतयं पूर्ण बहुमत मिळेल, तृणमूल काँग्रेसला वाटते आम्हाला पूर्ण बहुमत मिळेल,” असही राऊत म्हणाले आहेत.