विधानसभेसाठी शरद पवारांचा 225 चा नारा!! काय आहे मास्टरप्लॅन?

sharad pawar vidhansabha
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत 225 चा नारा दिला आहे. महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ जागा जिंकेल असा दावा शरद पवारांनी केला आहे. आज लातूर जिल्ह्यातील माजी आमदार सुधाकर भालेराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी बोलताना शरद पवारांनी वरील विधान केलं.

शरद पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ३१ जागांवर यश मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या त्यातील ८ जागा जिंकल्या. हि तर सुरुवात आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 288 जागांपैकी 225 जास्त जागांवर महाविकास आघाडी विजयी होईल. राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्या सोबत घेऊ.. देशात आपले राज्य प्रगत करूयात असं आवाहनही पवारांनी यावेळी उपस्थितांना केलं.

यावेळी शरद पवारांनी अजित पवार गट आणि सोडून गेलेल्या आमदारांवर सुद्धा निशाणा साधला. ज्यांना जनतेने, पक्षांने मान दिला त्या नेत्यांनी आमचा घात केलाय. उदगीर आणि देवळाली या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे.. हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो असं म्हणत शरद पवारांनी सुधाकर भालेराव यांचे पक्षात स्वागत केलं.