पाचगणी | आशिया खंडातील दोन नंबरचे पठार व स्वच्छतेत अव्वल नामांकन मिळालेल्या पाचगणी शहरांमध्ये माझी वसुंधरा अभियानांअतर्गत शहरातील विविध भागामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. पाचगणी नगरपालिकेकडुन माझी वसुंधरा अभियान अतंर्गत वृक्षारोपण कार्यक्रमांचा शुभारंभ मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या हस्ते करण्यात आला. पाचगणीत 3 हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर व सर्व नगरसेवकांच्या उपस्थित टेबललॅड येथे पार पडला . पाचगणी शहराला स्वच्छतेच्या सप्तपदीमध्ये प्रथम क्रमांकाच मानांकन प्राप्त आहे. पाचगणी शहरात स्वच्छ पाचगणी सह सदाहरीत पाचगणी शहराच स्पप्न माझी वसुधरा अंतर्गत पाचगणीच्या टेबललॅड, सिडणे पॅाईट, तसेच विविध पॅाईट येथे नगरपालीकेच्या माध्यमातुन वृक्षारोपण केले जात आहे. पाचगणी शहरांमध्ये नगर विकास खात्याच्या विविध योजना राबवण्याकरीता कृतीशील आरखडा कर्मचारी व सर्व नगरसेवक याच्या माध्यमातुन प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
वृक्षारोपण केलेल्या वृक्षाची संगोपनाची जबाबदारी सुद्धा योग्य रितीने पार पाडण्याकरीता योग्य ती काळजी नगरपालीकेच्या माध्यमातून घेतली जात असल्याची महत्वपूर्ण माहीती मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी दिली. ” अर्बन ट्री क्लस्टर” ही संकल्पना राबवत 2 आर क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रजातींचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच यावेळी झाडांचे संगोपन करण्याची शपथ ही घेण्यात आली .