राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे अनेक मित्र – नरेंद्र पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात माथाडी कामगार नेते नरेंन्द्र पाटील यांना सातारा लोकसभेसाठी भाजप कडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. ‘खासदारांचे विकास कामांकडे दुर्लक्ष होत आहे’ असे म्हणत पाटील उदयनराजे भोसले यांना सार्वजनिक कार्यक्रमांत टार्गेट करताना दिसत आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माझे अनेक मित्र आहेत” असे विधान करुन पाटील यांनी जिल्ह्यात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.

प्रत्येक नेत्याला आपल्या पक्षाचे बंधन असते. त्यामुळे मी जर उमेदवार असेल तर कोणी माझे काम करायचे आणि कोणी माझे काम करायचे नाही ? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असेल. मित्रत्वाचे नाते आणि पक्ष अशी गल्लत मी करणार नाही.मी लोकसभा निवडणूक लढवण्याचा विचार केला नव्हता. मात्र गेल्या आठवड्यात माझे नाव समोर आले आणि माझ्या उमेदवारीबाबत चर्चा सुरू झाली.

शिवसेना भाजपा नेते माझ्या उमेदवारीसह लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील. युतीच्या नेत्यांकडून जो उमेदवार उभा केला जाईल, तोच सातारा जिल्ह्याचा खासदार होईल, असे सांगत शिवसेना व आमच्यात कोणतीही मतभेद नाहीत असा दावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नरेंद्र पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कर्ज प्रकरणांबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आयोजित मेळाव्यानंतर कराडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘मी जर लोकसभा लढवण्यास इच्छुक असतो तर सहा महिन्यांपूर्वी पासून तयारी सुरु केली असती. मात्र मी तसे केले नाही.अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त युवकांना फायदा होऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी मी प्रयत्नशीलआहे.या महामंडळाचे फायदे मिळावेत म्हणून मी प्रत्येक तालुक्यात जात आहे. त्या ठिकाणी गेल्यावर विद्यमान खासदारांचे विकास कामांकडे दुर्लक्ष झाल्याचे लोकांच्या बोलण्यातून दिसून आले आहे.’ असे वक्तव्य नरेंद्र पाटील यांनी केले.मात्र त्याचवेळी ज्यांना परिवर्तन व्हावे असे वाटत असेल ते आमच्या सोबत असतील असा विश्वासही माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Leave a Comment