हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक ठरलं. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. दरम्यान आपलं हे सुवर्णपदक दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित करत आहे अशी प्रतिक्रिया नीरज चोप्रा यांनी दिली.
नीरज चोप्रा म्हणाले, मी माझे हे सुवर्ण पदक महान मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. मी कधीच सुवर्णपदक जिंकण्याचा विचार केला नव्हता, पण काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती. मला माहित होतं की आज मी माझे सर्वोत्तम करेन. मला ऑलिम्पिक स्पर्धेचा विक्रम मोडायचा होता”, अशी पहिली प्रतिक्रिया नीरजने विजयानंतर दिली.
म्हणून मिल्खा सिंग यांना पदक समर्पित-
ऑलिम्पिक स्पर्धेत युवा खेळाडूला अॅथेलेटिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकताना पाहायचंय, असं मिल्खा सिंह यांचं स्वप्न होतं. दुर्देवाने त्यांच्या हयातीत ते स्वप्न पूर्ण झालं नाही. मात्र ते स्वप्न नीरजने आता पूर्ण करुन दाखवलं. त्यामुळे मिल्खा सिंह याचं स्वप्न आता पूर्ण झालंय. या कारणामुळे नीरजने मिल्खा यांना हे पदक समर्पित केलंय.