माझी वसुंधरा : मलकापूर नगरपरिषदेकडून शनिवारी सायकल महारॅलीचे आयोजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत सन 2020- 21 या सालामध्ये माझी वसुंधरा 1.0 हे अभियान हाती घेतले होते. या अभियानामध्ये राज्यातील सर्व नगरपरिषदा, नगरपंचायती यांनी सहभाग नोंदविला होता. मलकापूर नगरपरिषदेने सुध्दा माझी वसुंधरा 1.0 या अभियानामध्ये सहभागी झाली होती.

मलकापूर नगरपरिषदेने माझी वसुंधरा 1.0 अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेबद्दल मलकापूर नगरपरिषदेस राज्यामध्ये तृतीय क्रमांकांचे मानांकन देऊन गौरविण्यात आलेले आहे. माझी वसुंधरा 1.0 नंतर पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने माझी वसुंधरा 2.0 हे अभियान हाती घेतले असून, या अभियानामध्ये सुध्दा मलकापूर नगरपरिषदेने सहभाग नोंदविला असून, मलकापूर शहरातील नागरिकांची पर्यावरण जनजागृती व्हावी. याकरिता शनिवार, दि. 12/02/2022 रोजी सकाळी ठिक 6.30 वाजता ढेबेवाडी फाटा, मलकापूर (पोलिस मदत केंद्रानजीक) या ठिकाणाहून पर्यावरण जनजागृती सायकल महारॅलीचे आयोजन करणेत आलेले आहे. सदर रॅलीचा उद्घाटन समारंभ कराडचे उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत पाटील यांचे शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे.

तरी मलकापूर शहरातील सर्व नागरिकांनी सायकल महारॅलीस उपस्थित राहणेचे आवाहन मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. निलम येडगे, उपनगराध्यक्ष तथा सभापती, पाणी पुरवठा, स्वच्छता व जलः निस्सारण समिती श्री. मनोहर भास्करराव शिंदे, श्री. राजेंद्र प्रल्हाद यादव बांधकाम समिती सभापती, सौ. पुजा गणेश चव्हाण सभापती नियोजन व शिक्षण समिती, सौ. गितांजली शहाजी पाटील सभापती महिला व बालकल्याण समिती तसेच मुख्याधिकारी श्री. राहुल मर्ढेकर यांनी केले.

सायकल रॅलीचा मार्ग असणार पुढीलप्रमाणे

ढेबेवाडी फाटा -इमर्सन कंपनी- ढेबेवाडी फाटा- कोल्हापूर नाका- मोहिते हॉस्पिटल- पीडी पाटील उद्यान मार्गे बैल बाजार रोड- लक्ष्मी नगर असा राहील, असे संयोजकांनी सांगितले आहे.

Leave a Comment