‘माझी पत्नी मला शोधून द्या’ अशी ‘त्या’ तरुणाची पोलिसांयुक्तांकडे मागणी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: एका वीस वर्ष तरुणीला पुंडलिकनगर पोलीस स्टेशनने नातेवाईकांच्या स्वाधीन केले होते. एका ४१ वर्षीय व्यक्ती सोबत ती पळून गेली अशी माहिती मिळाली होती. तिला सुखरूप तिच्या आई वडिलांच्या स्वाधीन पोलिसांनी केले अशी घटना २३ मे रोजी घडली होते. या घनेतीची दुसरी बाजू आता समोर अली आहे.

संदीप उत्तमराव शिंगणे ( ४१, रा. गोकुळनगर देवळाई परिसर) हाच वरील घटनेतील व्यक्ती असून त्याने आता ‘माझी पत्नी मला शोधून द्या’ असे म्हणत पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली आहे. संदीप आणि वीस वर्षीय तरुणी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. त्यांनी २३ मे रोजी पिसादेवी येथील महादेव मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर त्यांनी त्याच दिवशी थेट पुंडलिकनगर पोलीस स्टेशन गाठले. त्यावेळी त्या मुलीच्या नातेवाईकांनी त्याच्यावर हल्ला केला. पोलीस स्टेशन समोर मारहाण देखील केली. यात संदीप जखमी झाला. तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीवर दबाव टाकून तिला अज्ञातस्थळी घेउन गेली. असे आरोप संदीपने केले आहेत.

त्यानंतर त्याने पोलीस आयुक्तांकडे धाव घेतली. माझी पत्नी मला परत करा अशी तक्रार त्याने केली आहे. मला मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करावी असे देखील त्याने निवेदना द्वारे म्हंटले आहे.

Leave a Comment