Myanmar Gate Igatpuri Nashik | आपला महाराष्ट्र हा अनेक संस्कृती, सामाजिक परंपरेने सजलेला आहे. महाराष्ट्रामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत. त्यांना ऐतिहासिक वारसा आहे. आणि हीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासाठी अनेक लोक देश – विदेशातून महाराष्ट्रामध्ये येत असतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राला धार्मिक आणि अध्यात्मिक वारसा देखील आहे. येथे अनेक देवतांचे मंदिर आहेत. त्यांची तीर्थस्थान आहेत. येथील प्रत्येक शहराला एक इतिहास आहे. एक वैशिष्ट्य आहे. परदेशात फिरून देखील असा नजारा तुम्हाला पाहायला मिळणार नाही. अशी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात स्थित आहेत. आता महाराष्ट्रातील अशाच एका स्थळाबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ज्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला अगदी म्यानमार (Myanmar Gate Igatpuri Nashik ) या देशात गेल्यासारखे वाटेल.
महाराष्ट्रातील नाशिक हा जिल्हा धार्मिक आणि अध्यात्मिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत. जी पाहण्यासाठी अनेक लोक देश-विदेशातून नाशिकमध्ये येत असतात. अशातच नाशिकमध्ये एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी फिरताना तुम्हाला म्यानमार या देशात फिरतोय असाच फील येईल.
या ठिकाणाचे नाव धम्मगिरी विपश्यना केंद्र असे आहे. हे ठिकाण इगपुरी रेल्वे स्थानकापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच तुम्ही या रेल्वे स्थानकावर उतरून अगदी चालत देखील या ठिकाणी जाऊ शकता. या धम्मगिरी विपश्यना केंद्रामध्ये अनेक लोक देश विदेशातून येत असतात. आणि मेडिटेशन करत असतात. कारण हे ठिकाण अत्यंत शांत आणि धार्मिक आहे.
म्यानमारच्या (Myanmar Gate Igatpuri Nashik ) बौद्ध धर्मीयांनी हे एक पारंपरिक बौद्ध शैलीतील प्रवेशद्वार पर्यटकांसाठी बांधलेले आहे. जे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत असते. या ठिकाणी केलेले कोरीव काम त्याचप्रमाणे येथील निसर्गरम्य हवामान सगळ्यांना मोहित करते. म्यानमार गेट हे धम्मगिरी या जागतिक विपश्यना केंद्राचे प्रवेशद्वारे आहे. याला बुद्धपार्क असे देखील म्हणतात. या म्यानमार गेटची रचना म्यानमार येथील थायलंडमधील असलेल्या कलाकृती प्रमाणेच आहे. अगदी या म्यानमारचा रंग त्याचप्रमाणे त्याची रचना, त्याची भव्यता सगळे म्यानमारमधील कलाकृतीप्रमाणे पाहायला मिळते.
त्याचमुळे नाशिक जवळील हे म्यानमार गेट स्थळ म्यानमार गेट नावाने प्रसिद्ध आहेत. अनेक लोक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणाला भारतातील म्यानमार असे देखील म्हणतात. त्यामुळे तुम्हाला तुमचे जर बजेट कमी असेल आणि तुम्ही देशाच्या बाहेर जात नसाल, तर नाशिकमधील हे म्यानमार गेट तुमच्यासाठी अत्यंत चांगला पर्याय आहे. तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता.