Mylan ने भारतात आणले कोविड -१९ वरचे औषध; बाजारात किंमत किती असेल ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ड्रगमेकर Mylan NV ने सोमवारी सांगितले की रेमडेसिवीरचे जेनेरिक वज़र्न लॉन्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. कोविड -१९ च्या उपचारासाठी गिलियड सायन्सेसने सर्वप्रथम रेमडेसिवीर हे औषध लॉन्च केले होते. या मंजुरीनंतर Mylan NV म्हणाले की, हे औषध भारतात 400 मिलीग्रामच्या कुपीला 4,800 रुपये किंमतीला विकेल. जगभरात कोरोना विषाणूच्या बाबतीत भारत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे.

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) Mylan NV चे औषध रेमडेसिवीरला मान्यता दिलेली आहे. या औषध निर्मात्या कंपनीने या औषधाला Desrem असे नाव दिले आहे. कोविड -१९ रुग्णांमध्ये आणीबाणीच्या वेळी हे औषध वापरले जाईल. कंपनीने एक निवेदन जारी करून याबाबतची माहिती दिली आहे.

इतर दोन कंपन्यांनी यापूर्वीच औषध लॉन्च केले आहे
यापूर्वीच दोन भारतीय कंपन्यांनी या औषधाचे जेनेरिक व्हर्जन आधीच बाजारात आणले आहे. त्यामुळे मायलन आता तिसरी कंपनी बनली आहे. Mylanच्या आधी सिप्ला लिमिटेड आणि हेटरो लॅब्ज लिमिटेड यांनी हे औषध लॉन्च केले होते. सिप्लाने Cipremi हे औषध 5 हजार रुपयांत आणि हेटरोने Covifor ची किंमत 5,400 रुपये ठेवली.

Mylan भारतातच रेमडेसिवीर तयार करेल
Mylan NV म्हणाले की ते रेमेडिसिव्हिर हे औषध भारतातच आपल्या स्वतःच्या सुविधांमध्ये बनवेल. कंपनीने आपल्या निवेदनात असे म्हटले आहे की कोविड -१९ च्या संसर्गाने ग्रस्त अशा रूग्णांसाठी आहे कि ज्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर हे औषध वापरण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच हे औषध प्रौढांसाठी आणि मुलांसाठी देखील वापरले जाऊ शकते.

गिलियड ने प्रति रुग्ण 2,340 डॉलर किंमत ठेवली आहे
गिलियडने श्रीमंत देशांसाठी रेमेडिसिव्हिर औषधाची किंमत ही प्रति रुग्ण 2,340 डॉलर ठेवली आहे. पुढील तीन महिन्यांत या कंपनीने आपल्या एकूण पुरवठ्यापैकी निम्मा पुरवठा हा अमेरिकेत पाठविण्याचे मान्य केले आहे. यानंतर, जगभरातील इतर देशांमध्ये या औषधाच्या उपलब्धतेबद्दल चिंता वाढली आहे.

युरोपमध्येही रेमेडीसवीरला मान्यता देण्यात आली आहे
हे लक्षात घेण्यासारखे आहे की रेमेडीसवीरच्या क्लिनिकल ट्रायल मध्ये हे उघड झाले आहे की जेव्हा कोविड -१९ च्या रूग्णांना हे औषध इंट्रावेनस स्वरूपात दिले जाते तेव्हा ते त्वरीत या संसर्गापासून मुक्त होतात. तेव्हापासून, रेमेडसवीरची मागणी जगभरात वाढली आहे. शुक्रवारी या औषधास युरोपियन कमिशनकडून सशर्त मान्यताही मिळाली आहे, त्यानंतर आता ते 27 युरोपियन देशांमध्ये वापरले जाऊ शकते.

गिलियड सायन्सेस या कंपनीने भारताशी करार केला आहे
गिलियड सायन्सेसने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, जुबिलंट लाइफ सायन्सेस लिमिटेड, सिग्नेज इंटरनेशनल लिमिटेड आणि भारतासाठी लेडस कॅडिला यांच्याशी नॉन-एक्सक्लुसिव करार केला आहे. यानंतर या कंपन्या आता भारतात या रेमेडिसवीर औषधाची निर्मिती आणि विक्री करू शकतील.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment