औरंगाबाद: पिसादेवी येथील विवाहितेचा हत्येचा रहस्य उलगडलं असून पत्नीला न विचारता तिचे दागिने विकल्यावरून झालेल्या भांडणात पतीने पत्नीच्या डोक्यात व्यायामाच्या डंबेल्स आणि दगडाचे ठेचून निर्घृण हत्या केली होती तेंव्हा पासून तो फरार होता.दिवदमन या केंद्रशासित राज्यातून त्याला चिकलठाणा पोलिसांनी अटक केली.सिद्धेश गंगाधर त्रिवेदी वय-35 (रा.रुख्मिनी अपार्टमेंट, पिसादेवी) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अधिक माहिती अशी की, आरोपी सिद्धेश ने तिची पत्नी कविता त्रिवेदी (वय-30) हिने कपाटात ठेवलेले दागिने न विचारता विकले या कारणावरून 17 फेब्रुवारी रोजी पती-पत्नी मध्ये कडाक्याचे भांडण झाले होते.दरम्यान आरोपी सिद्धेशने व्यायामाच्या डंबेल्स ने कविताच्या डोक्यावर वार केले व तिच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घृण हत्या केली.
हत्येनंतर त्याने घराचा दरवाजा बाहेरून लावून पसार झाला.रात्रभर मुलगा आणि मुलगी अशी दोन्ही चिमुकले रात्रभर आईच्या मृतदेहाजवळ रडत होते. शेजाऱ्यांच्या सातर्कतेने हा प्रकार समोर आला तेंव्हा पासून पोलीस सिद्धेश चा शोध घेत होते. चिकलठाणा पोलिसांनी त्याला दिव दमण राज्यातून अटक केली. पोलिसांनी हत्येचे कारण विचारले असता न विचारता सोन्याचे दागिने विकल्यावरून वाद झाल्यानंतर पत्नीची हत्या केल्याचे कबुल केले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group