नादखुळा : सातारच्या जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी

बाॅऊर्न्स हटविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा आंदोलनाचा इशारा

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा येथील जम्बो कोविड हाॅस्पीटलमध्ये आता जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी नेमण्यात आले आहेत. कोव्हिड पेशंटना दिलासा देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सेंटरमध्ये मात्र नातेवाईकांचा चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे. येथे ठेवण्यात आलेल्या बाॅऊर्न्समुळे सध्याची परिस्थिती काय आहे, यांचे भान न राखता सातारकरांचा नादखुळाच याला म्हणावे लागेल. बाॅऊंर्न्स हटविण्यासाठी सातारा येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी व संस्थानी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना बाधित झाल्यानंतर बाधितांसह त्यांचे कुटुंब एका टेन्शनमध्ये असते. तेव्हा रूग्ण बरा होवून घरी येण्यापर्यंत तसेच त्याच्यात नैराश्य येवू नये म्हणून नातेवाईक प्रयत्न करीत असतात. तसेच त्याला धीर देण्यासाठी त्यांची विचारपूर करण्यासाठी कोव्हिड सेंटरला भेट देत असतात. परंतु यांचे गांभीर्य लक्षात न घेता सातारच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये चक्क 18 जम्बो बाॅऊर्न्स बंदोबस्तासाठी ठेवण्यात आले आहेत.

कोव्हीड सेंटरला काही अनुचित प्रकार घडत असल्यास किंवा गरज असल्यास पोलिस बंदोबस्त बिनपैशाचा उपलब्ध करून दिला जातो. तसेच शासकीय नियमानुसार येथे लोकांना वागणूक दिली जाते. परंतु आता खासगी बाॅऊर्न्सस ठेवण्यात आल्याने नातेवाईकांनी विचार करूनच कोव्हीड सेंटरची पायरी चढाईची आहे. तसेच पेशंटही दाखल करताना या बाॅऊर्न्सचा पहिला विचार करावा लागणार आहे.

जिल्हा प्रशासन कमी पडत आहे का?

जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये खासगी बाॅऊर्न्स ठेवण्याची वेळ आली आहे का आणि आली असेल तर जिल्हा प्रशासन काय करत आहे. खासगी बाॅऊर्न्स ठेवले जात असतील तर जिल्हा प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे, असे म्हणायचे का? तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याबाबत काय भूमिका घेणार हे पहाणे गरजेचे आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचा इशारा

कोव्हिड सेंटरमध्ये इंजेक्शनचा काळाबाजार चालतो. पेशंट आतमध्ये घेण्यासाठी वशिलेबाजी चालते आणि हा होणारा कारभार दडपण्यासाठी हे बाॅऊर्न्स नेमलेले आहेत. बाॅऊर्न्स त्वरीत हटावावे अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.

ताैक्ते वादळ साताऱ्याला धडकून गेले, जिल्हाधिकारी आणि जम्बो कोव्हिड सेंटरचे व्यवस्थापन यांच्यावर मोठा परिणाम करून गेले आहे आणि त्यांना कोव्हिड सेंटर आता डान्सबार वाटू लागले आहे.  सिव्हिलला केवळ दोन पोलिस नियंत्रण आणतात. जिल्हा नियोजनमधून पैसे देवून काळाबाजार करण्याचा प्रयत्न आहे. तेव्हा नातेवाईकांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे. जर आजच्या आज बाॅऊर्न्स हटविले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

रूग्णांच्या मदतीसाठीच बाॅऊर्न्स ः व्यवस्थापन

रूग्णांच्या मदतीसाठी आणि नातेवाईकांच्या सोईसाठीच बाॅऊर्न्स नेमण्यात आलेले आहेत. सातारा पोलिसांच्यावर आमचा विश्वास आहे. पोलिस शासकीय सेवक आहेत. तेव्हा गेट उघडणे, रूग्णांना मदत करणे यासाठी आम्ही बाॅऊर्न्स नेमले असल्याचे जम्बो कोव्हिड सेंटरच्या व्यवस्थापनाने सांगितले आहे.

You might also like