धक्कादायक ! खंडणी म्हणून मागितले मुंडके, अपहरण करून मुलाची हत्या

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका 15 वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. मृत मुलाचे नाव राज पांडे असे आहे. आरोपीने राजची हत्या करुन त्याचा मृतदेह रिंगरोड परिसरात फेकला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

हि घटना नागपूरच्या MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरामाता नगरमध्ये घडली आहे. आरोपीचे नाव सुरज शाहू असे आहे. आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरजने हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. आरोपी सुरज शाहू एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात आहे.

गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सुरजने राज याचे अपहरण केले होते. यानंतर आरोपीने खंडणी म्हणून मृत राज याच्या काकांच्या मुंडक्याची धक्कादायक मागणी केली होती. हि मागणी पूर्ण न झाल्याने आरोपीने राजची हत्या करुन मृतदेह रिंगरोड परिसरात फेकून दिला होता. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

You might also like