हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या देशभरातील अनेक शहरांत मेट्रोचे काम जलदगतीने चालू आहे. त्यातच आता नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro 2) विस्तारिकरणासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मेट्रो – २ ची लांबी ४३.८ किलोमीटर असून यामध्ये ३२ मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. या प्रकल्पावर तब्बल ६७०८ कोटी रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे.
नागपूर मेट्रो -2 च्या माध्यमातून 43.80 km अंतराची नवीन मेट्रोची मार्गीका उभारली जाईल. सध्या नागपूर मेट्रोची phase -1 अंतर्गत 38.21 km चा मार्ग प्रवाश्यांसाठी खुला केलेला आहे. Phase -1 मध्ये सध्या ऑरेंज व एक्वा ह्या दोन वेगवेगळ्या लाईन खुल्या करण्यात आलेल्या आहेत. आता मात्र नागपूर मेट्रो -2 अंतर्गत 43.80 km एवढ्या अंतराचे विस्तारिकरण केले जाणार आहे. मेट्रो -2 मध्ये साधारणपणे 32 नवीन मेट्रो स्टेशन असतील .नागपूर मेट्रो -2 साठी 6708 कोटी खर्च अपेक्षित आहे.ज्याद्वारे मेट्रो -2 चे काम पुर्ण केले जाणार आहे.
2028 पर्यंत प्रकल्प होणार पूर्ण –
मेट्रो -2 च्या विस्तारिकरणाचे काम पुर्ण होण्यासाठी 2028 पर्यंतचा अंदाजे वेळ लागू शकतो. त्यानंतरच मेट्रो -2 चा हा भाग प्रवाश्यांच्या सेवेत असेल. मेट्रो-2 प्रकल्पाअंतर्गत सध्या खापरीपर्यंत असणारी मेट्रोची सुविधा बुटीबोरी शहरापर्यंत उपलब्ध होणार आहे. सध्या मेट्रो ऑटोमोटिव्हपर्यंतची मेट्रो विस्तारिकरणानंतर कन्हान शहरापर्यंत धावणार आहे. सध्या प्रजापती नगरपर्यंत धावणारी मेट्रो ही कापसीपर्यंत धावणार आहे. आणि लोकमान्य नगरपर्यंत असणारी मेट्रो हिंगणा गावापर्यंत धावेल, असा हा मेट्रोचा विस्तार होणार आहे. बुटीबोरी आणि हिंगणा या दोन मुख्य औद्योगिक क्षेत्राला मेट्रोची कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाल्यानंतर ह्या मार्गांवर प्रवाश्यांची संख्या देखील अधिक वाढेल. ऑटोमोटिव्ह ते कन्हान पर्यंत मेट्रो-2 अंतर्गत 13 km ची विस्तारित मार्गीका उभारली जाणार आहे. तर मिहान ते बुटीबोरी दरम्यान मेट्रो -2 च्या माध्यमातून एकूण 18.7 km चा विस्तार केला जाणार आहे.