Nagpur Nashik Special Train : नागपूर ते नाशिक स्पेशल ट्रेन; या 16 स्थानकांवर थांबणार

Nagpur Nashik Special Train
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nagpur Nashik Special Train। विदर्भातून उत्तर महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्ये रेल्वेने नागपूर आणि नाशिक रोड दरम्यान ट्रेन ऑन डिमांड व्यवस्थेअंतर्गत दोन एकेरी अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रवाशांच्या वाढत्या गर्दीला सावरण्यासाठी मध्ये रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, येत्या २३ आणि २४ जुलैला २ रेल्वे गाड्या नागपूर ते नाशिक दरम्यान धावतील. या ट्रेनमुळे नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आरामदायी होईल अशी अपेक्षा आहे.

नागपूर ते नाशिक रोड दरम्यान चालवण्यात येणाऱ्या या दोन्ही ट्रेन (Nagpur Nashik Special Train) या वन वे ट्रेन असणार आहे. २३ आणि २४ जुलै २०२५ रोजी हि ट्रेन नागपूर वरून संध्याकाळी ७:३० ला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता नाशिक रेल्वे स्टेशनला पोहोचेल, हा प्रवास हा जवळपास १० तासांचा असेल. या दोन्ही शहरादरम्यान असलेल्या महत्वाच्या स्टेशन वर हि ट्रेन थांबेल. प्रवाशांची गर्दी कमी व्हावी आणि आरामदायी प्रवास करता यावा यासाठी या रेल्वे चालवल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या काळात प्रवाशांची गरज ओळखून ट्रेन ऑन डिमांड हि सेवा सुरु केली आहे. लाखो प्रवाशाना या सेवेचा फायदा होत असतो.

कोणकोणत्या स्थानकांवर थांबा मिळेल ? Nagpur Nashik Special Train

नागपूर ते नाशिक दरम्यान धावणाऱ्या या विशेष ट्रेनमध्ये (Nagpur Nashik Special Train) १८ सामान्य अनारक्षित कोच असतील, ज्यात १६ सामान्य अनारक्षित आणि २ एसएलआरडी कोच चा समावेश आहे. हि रेल्वेगाडी नागपूर, अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि नाशिक या रेल्वे स्थानकांवर थांबेल. महत्वाच्या स्थानकांवर थांबा असल्याने विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही ट्रेन पूर्णतः अनारक्षित स्वरूपात असल्यामुळे अगदी ऐनवेळी प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही या गाडीचे तिकिट काढता येणार आहे आणि प्रवास करता येणार आहे. ट्रेनला ऑनलाईन रिझर्वेशनची सुविधा नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरच जाऊन तिकिट काढता येणार आहे.