व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नागपूरातील २ तरुणींना मध्यप्रदेशात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; सलग ३ महिने झाला अत्याचार

नागपूर । दिवसेंदिवस महिला संबंधीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. देशातील कुठल्याकुठल्या भागातून अनेक महिलांवरील शोषणाच्या घटना घडत आहेत. नागपूरातील दोन तरुणींना मध्यप्रदेशातील टिकमगढ येथे विकल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहे. पोलिसांनी मध्यप्रदेशातून दोन्ही तरुणींची सुटका केली असून या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या गिट्टीखदान परिसरात राहणाऱ्या दोन तरुणी भांडे विक्री चा काम करायचा. आकाश नावाच्या व्यक्तीने त्या दोघींना मध्यप्रदेशात या व्यवसायाला संधी असून चांगला मोबदला मिळेल असा अमिश दाखविला. त्यामुळे दोन्ही तरुणी साडे तीन महिन्यांपूर्वी मध्यप्रदेशातील टिकमगढ ला गेल्या. मात्र, तिथे आकाशने दोघींना टोळीतील इतर सदस्यांच्या मदतीने १ लाख ९० हजार रुपयात एका वयस्कर माणसाला विकले. दोन्ही तरुणींचे बळजबरीने लग्न लावले गेले, आणि त्यानंतर दोघींना मारहाण आणि शारीरिक शोषणाचा क्रम सुरू झाला.

दरम्यान, परराज्यातील दोन तरुणींना टिकमगढला आणून त्यांच्यावर अत्याचार केले जात असल्याचा बोभाटा त्या गावात झाला आणि माहिती मध्यप्रदेश पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर मध्यप्रदेश पोलिसांनी दोन्ही तरुणींना ताब्यात घेत नागपूरात संपर्क साधले आणि हे सर्व प्रकार उघडकीस आले. दोन्ही तरुणींना नागपूरात आणण्यात आले असून नागपूर पोलिसांनी या प्रकरणी आकाशला अटक केली आहे. तर टोळीतील इतरांचा शोध घेतला जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”