मुंबई | आई आणि मुलाच्या अतुट नात्यावर भाष्य करणारा ‘नाळ’ चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने बॉक्स आॅफिसवर चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. पहिल्याच आठवड्यात ‘नाळ’ने हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत तब्बल १४ कोटींची विक्रमी कमाई केली. ‘सैराट’ पाठोपाठ पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘नाळ’ने मान पटकावला आहे. नागराज मंजुळेंची प्रस्तुती असलेला आणि सुधाकर रेड्डी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे.
सर्वसामान्य माणसांचं जगणं रुपेरी पडद्यावर मांडणा-या लोकभाषेत अभिव्यक्त होणा-या एका साध्या तरीही तरल कथेला प्रेक्षकांनी दिलेला हा उदंड प्रतिसाद म्हणजे रसिकांच्या अभिरूची संपन्नतेची पावती असल्याची भावना नागराज मंजूळे यांनी व्यक्त केली. चित्रपटगृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहे. सोशल मीडियावरुनही चित्रपटाबद्दल, चित्रपटाची कथा, नागराज मंजूळे यांच्यासह इतर कलाकारांचा तगडा अभिनय आणि बालकलाकार चैतूच्या म्हणजेच श्रीनिवास पोकळेच्या अभिनयाबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
दुस-या आठवड्यात हा चित्रपट ४५० चित्रपटगृहे आणि ११ हजार खेळांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मुंबईसह राज्यातील इतर भागातही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि इतर शहरांमध्येही या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रासह हा चित्रपट इतर राज्यातही प्रदर्शित झाला आहे. चेन्नई आणि बंगळुरू इथे प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी खेचण्यात नाळ यशस्वी झाला आहे.
#NewProfilePic pic.twitter.com/vrLQ1Z045P
— nagraj manjule (@Nagrajmanjule) November 11, 2018
सूरज…सोमनाथ…अरबाज…तानाजी…रिंकू…
आकाश…सगळ्यांच्या आयुष्यात असाच एक दिवस आलता…
आज श्रीनिवास पोकळेचा दिवस आहे…चांगभलं !!! pic.twitter.com/QWuflog7Sa
— nagraj manjule (@Nagrajmanjule) November 16, 2018