नागठाणेतील खूनांचा गुन्हा 6 तासात उघडकीस : पत्नीला दारूचे व्यसन असल्याच्या कारणातून पतीनेच केला खून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यात नागठाणे येथे महिलेला दारूचे व्यसन असल्याच्या कारणातून खून झाल्याची घटना आज मंगळवारी दि. 20 सकाळी उघडकीस आली होती. पोलिसांच्या तपासात अवघ्या 6 तासात या महिलेचा खूनांचे कारण शोधण्यात तसेच आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले आहे. सदरचा खून महिलेच्या पतीने लाकडी दांडके डोक्यात घालून केला असल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मालन बबन गायकवाड या 55 वर्षीय महिला मृत अवस्थेत आढळून आलेली होती. त्या महिलेच्या डोक्यावर व अंगावर वार दिसून आले असल्याने हा प्रकार खूनाचा असल्याचा लक्षात आला. या खूनप्रकरणी अधिक चाैकशी करत असताना महिलेच्या पतीवर संशय होता, त्याच्याकडे सखोल चाैकशी केली. तेव्हा पती बबन गायकवाड यांनी खूनाचा गुन्हा कबूल केलेला आहे. अधिक चाैकशीत पतीने पत्नीला दारूचे व्यसन असल्याने खून केल्याचे सांगितले. कालही पती- पत्नीमध्ये वाद झाला होता, या वादात पत्नीला मारहाण केली त्यामध्ये तिचा खून झाला आहे.

संशयित आरोपी असलेल्या पती बबन गायकवाडला बोरगाव पोलिसांनी अवघ्या 6 तासांत ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या घरातून 300 देशी दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. याप्रकरणी अविनाश साळुंखे याने दारूच्या बाटल्या ठेवल्या असल्याने त्याच्यावर स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांनी दिली आहे.

Leave a Comment