सरकारची सर्वत्र छी-थू झाल्यावर शेतकऱ्यांसाठी रोवलेल्या खिळ्यांना प्रशासनाकडून काढायला सुरुवात

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांच्या कृषी कायदे मागण्यांकडे डोळेझाक करत आंदोलन स्थळावर शेतकऱ्यांशी युद्ध करण्याचाचं पवित्रा घेतला. दिल्ली सीमेवरील आंदोलनस्थळी तटबंदी करत वाटेत अनेक अडथळे निर्माण केले.

आंदोलनस्थळावर जाणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी तारांचे कुंपण घातले. जागोजागी रस्त्यांवर खड्डे खोदले. इतकेच नव्हे वाटेत अणुकुचीदार खिळे रोवत आंदोलन स्थळापर्यंत कोणी पोहोचूच नये अशी तयारी प्रशासनाकडून करण्यात आली.

याचे तीव्र पडसाद समाज माध्यमावर पडू लागले. सरकारच्या असंवेदनशील आणि शेतकरी हे शत्रू असल्याचे मानत त्यांना प्रताडित करण्याच्या कृतींचा निषेध होऊ लागला. दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांच्या वाटेत रोवलेल्या खिळ्यांवर संसदेतही सरकारची किरकिरी झाली. यानंतर आता  आंदोलस्थळाच्या वाटेतील हे खिळे प्रशासनाकडून काढले जात असल्याची दृश्ये समोर आली आहेत. यामध्ये रस्त्यांवर रोवण्यात आलेले हे खिळे काढले जात असल्याचे दिसत आहे.  ही दृश्य दिल्लीच्या गाझीपूर सीमेवरील आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’. 

You might also like