घाटकोपर (मुंबई) | सुरज शेंडगे
नालासोपारा स्फोटक प्रकरणात पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.अविनाश पवार (वय३०) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो सनातन संघटनेशी निगडित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.अविनाश पवार याला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.नालासोपारामध्ये वैभव राऊत या गोरक्षकाला पोलिसांनी अटक केल्यापासून राज्यभर पोलिसांनी अटक सत्र राबवले आहे. या अटक सत्रातून रोज नवे खुलासे होत आहेत.पाच वर्षे रखडलेल्या दाभोलकर खुनाचा उलगडा याच अटक सत्रातून झाला आहे.तसेच सांगलीच्या तासगाव तालुक्यातून दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.परंतु तपास कार्यात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून या दोघांची नावे गुप्त ठेवण्यात आली आहेत .
अविनाश पवार याच्या रात्री झालेल्या अटकेमुळे घाटकोपर परिसरात घबराटीचे वातावरण आहे.महाराष्ट्र एटीएस पथकाच्या राज्यभर चालणाऱ्या कार्यवह्यात कमालीची गुप्तता ठेवली आहे.