नमो भारत रॅपिड रेल्वे आजपासून प्रवाशांच्या सेवेत; तिकीट किती? वेग किती असणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिल्ली ते गजियाबाद असा 17 km चा प्रवास करण्यासाठी देशामधील पहिला सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेचे उदघाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 20 ऑक्टोबर रोजी झाले. यामुळे दिल्ली कॅपिटल क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यात मोठी मदत मिळणार आहे. हा संपूर्ण दिल्ली-गाझियाबाद-मेरठ कॉरिडॉर 82.15 km असून जून 2025 पर्यंत हा संपूर्ण कॉरिडॉर सुरु करण्यात येणार आहे. आता ह्या रेल्वेचा वेग, भाडे किती असेल असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. चला तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

किती असेल वेग?

नमो भारत ह्या नावाने ओळखली जाणारी ही सेमी हाय स्पीड रेल्वे ताशी 130-140 किमीचा वेग प्राप्त करेन. एवढेच नवे तर ह्यातील विशेष बाब म्हणजे गाडीचा वेग आणि स्थानकाची माहिती डब्याच्या आतील लावलेल्या स्क्रीनवर दिली जाईल.

किती असेल गाडीचे भाडे?

नमो भारत ट्रेन ही नामांतर झालेली ट्रेन आहे. परंतु त्यातील फिचर आणि वैशिष्ट्य हे अत्यंत वेगळे असल्यामुळे त्यास एक वेगळेच स्वरूप मिळाले आहे. त्यामुळे गाडीचे भाडे हे स्पेसिअल डिपार्टमेंटमधील साहिबाबाद स्टेशन ते दुहाई डेपो स्टेशनपर्यंतच्या प्रत्येकी प्रवासासाठी 50 रुपये खर्च येईल, तर प्रीमियम-क्लास कोचमध्ये त्याच मार्गाचे भाडे हे 100 रुपये असेल. तसेच साहिबााबाद प्रमाणे एकाच स्थानकात प्रवेश केल्यावरही 20 रुपये मोजावे लागणार आहे. तर 90 सेमीपेक्षा कमी उंची असलेल्या मुलांना मोफत प्रवास देण्याची सुविधा येथे उपलब्ध करण्यात आली आहे. म्हणजे सामान्यांच्या खिशाला परवडेल अशी येथील सोय व सुविधा ह्या नागरिकांना मिळणार आहेत.

कसं असेल टाइम टेबल?

रेल्वेचे काल उदघाटन झाले आणि आज म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजता ही गाडी सुटून ती रात्री 11 वाजेपर्यंत सेवा देणार आहे. हे गाडीचा ट्रायल असणार आहे. त्यामुळे ह्या गाड्या दर 15 मिनिटांनी धावणार आहेत. एवढंच नाही तर असे देखील सांगण्यात येत आहे की, गाडीची वारंवारता ही भविष्यात वाढू शकते. त्यामुळे नमो भारत रेल्वेला आता लोकांकडून कसा प्रतिसाद भेटतो ते पाहणं गरजेचं आहे. हे मात्र नक्की.

असे करा तिकीट खरेदी

नमो भारत रेल्वेचा प्रवास करण्यासाठी तुम्ही स्थानकातिल QR कोडचा वापर करून त्यावरून तिकीट खरेदी करू शकता. तसेच UPI सारख्या ऑनलाईन पेमेंटचा वापर करू शकता. ह्यावरून सहज आणि सुलभ तिकीट खरेदी तुम्ही करू शकता.