“केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरी हे सरकार पडणार नाही”; नाना पटोलेंचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीबाबत राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वर निशाणा साधला आहे. “केंद्राच्या जुलमी आणि अघोषित आणिबाणीबाबत पंतप्रधान यांना सांगायला शरद पवार गेले होते. केंद्रीय तपास यंत्रणेचा कितीही दुरुपयोग केला तरीही हे सरकार पडणार नाही. महाराष्ट्रात भोंगा वाजवायचा प्रयत्न झाला, अशी टीका पटोले यांनी केली.

नाना पटोले यांनी आज नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यात जातीय दंगल घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. सुडबुद्धीच्या राजकारणाचा परिणाम आज भाजपला कळत नाही. ज्या दिवशी भाजपला कळेल त्या दिवशी भाजपकडे काहीही राहणार नाही, असेही पटोले म्हणाले.

जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता पाठिंबा देणार नाही

पंतप्रधान कुठल्या पक्षाचा नसतो असे आम्ही समजतो. पवारांनी पंतप्रधानांकडे संजय राऊत संदर्भातली परिस्थितीही सांगितली आहे. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये धार्मिक दंगली घडविण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. आता काही राजकीय पक्ष मशिदीवरील भोंगे काढावे, असा फतवा काढत आहेत. राज्याचे भाजपचे नेते त्याला पाठिंबा देत आहेत. म्हणजेच भाजपचे नेते जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न आहेत. महाराष्ट्राची जनता अशा प्रयत्नांना कधीही पाठिंबा देणार नाही जनता समजूतदार आहे, असंही पटोले यांनी सांगितले.

Leave a Comment