पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा सहभाग; नाना पटोलेंचा मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या महाराष्ट्रामध्ये पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण (Porsche Car Accident Case) चर्चेचा भाग बनले आहे. या प्रकरणामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांनी म्हणले आहे की, “ज्यावेळी घडला त्यावेळी पबमधून दोन गाड्या निघाल्या, त्यांच्यात रेस लागली. त्यातली एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहिली त्या गाडीनं दोघांना चिरडलं. जी दुसरी गाडी होती, त्यात एका आमदाराचा मुलगा होता.” त्यामुळे सध्या चर्चांचा वेग आणखीन. वाढला आहे.

पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “पबमधून जाताना दोन गाड्या होत्या. त्या गाड्यांमध्ये रेस लागली होती. एक गाडी पुढे गेली आणि जी गाडी मागे राहीली त्या गाडीने दोघांना चिरडलं, जी गाडी पुढे गेली त्यात एका आमदाराचा मुलगा होता. कोण आमदार? हे मुख्यमंत्री यांनी सांगीतल पाहिजे. मुख्यमंत्री सुट्टी घेऊन गेले, दोन उपमुख्यमंत्री हे जनतेच्या आरोपीच्या पिंजऱ्यांत आहेत.”

त्याचबरोबर, “या घटनेतील डॉ. तावरेंनी सर्वांची नावं समोर आणणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यांना सुरक्षा पुरवावी आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी” अशी मागणी नाना पटोले यांनी केली. “डॉ. तावरे याप्रकरणाचे साक्षीदार आहेत, त्यामुळे त्यांना सुरक्षा पुरवली पाहिजे. तावरेंच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. सरकारने याची काळजी घेतली पाहिजे. कोण पोलीस आणि डॉक्टर यांच्यासोबत बोलत होतं, याची चौकशी झाली पाहिजे” असेही नाना पटोले यांनी म्हणले.

दरम्यान, “ही घटना हायप्रोफाईल आहे, या घटनेत ज्या पद्धतीनं पुरावे नष्ट केले जात होते, त्यावरुन हायप्रोफाईल असल्याचं सिद्ध होत होतं. म्हणजेच, या घटनेशी सहाव्या मजल्याचं कनेक्शन नक्कीच आहे. त्यामुळे त्यांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे” अशी मागणी पोर्शे कार अपघात प्रकरणात नाना पटोले यांनी केली आहे.