Thursday, October 6, 2022

Buy now

“10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय”; चंद्रकांतदादांनंतर आता नाना पटोलेंचे मोठे विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे भाजप नेत्यांकडून भाकीत केले जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 10 मार्चनंतर सरकार बदलणार,असे विधान केले होते. त्याच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकार बदलाबाबत सूचक असे मोठे विधान केले आहे. “हे जे काही सरकार मध्ये सुरु आहे, त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली आहे. 10 मार्च नंतर सरकार दुरुस्त करतोय, असे पटोले यांनी म्हंटले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या बदलाबाबत मोठे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, सध्या पाच राज्याच्या निवडणुका आहेत. त्याबाबत माझे पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली आहे.

सध्या राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जे काही चालले आहार. ज्या घडामोडी सुरु आहेत. त्याला दुरुस्त करण्याची वेळ आली असल्याचेही पटोले यांनी म्हंटले. पटोले यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहार. आता दहा मार्चनंतर नक्की काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.