अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र नाना पटोलेंच्या हाती; प्रणिती शिंदेंसह ‘या’ नेत्यांना नवी जबाबदारी

मुंबई । विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षसोबतच काँग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली आहे.

नव्या प्रदेश कार्यकारिणीत ६ जणांना कार्यकारी अध्यक्षपद देण्यात आलं आहे. त्यात नव्या आणि जुन्या अशा नेत्यांचा समावेश आहे. सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचीही कार्यकारी अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. याशिवाय, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोंरट्याल. बी.एल नगराळे, शरद आहेर, एम.एम शेख , माणिकराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्येही पक्ष संघटनेत कार्यकारी अध्यक्षपद नव्याने निर्माण करण्यात आले आहे.

संसदीय कमिटीमध्ये कोणाची निवड?
नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शरद रणपिसे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, शिवाजीराव पाटील, मुकुल वासनिक, रजनी पाटील, राजीव सातव, अविनाश पांडे, मिलिंद देवरा, विलास मुत्तेमवार, माणिकराव ठाकरे, भाई जगताप, के. सी पाडवी, विजय वडेट्टीवार, सुनील केदार, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, अस्लम शेख, विश्वजित कदम, अमित देशमुख, वसंत पुरके, सुरेश शेट्टी, हुसेन दलवाई, अनंत गाडगीळ, बाबा सिद्धीकी, आशिष देशमुख, भालचंद्र मुणगेकर यांची निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, नाना पटोले यांच्या रुपाने काँग्रेसला आक्रमक प्रदेशाध्यक्ष मिळाला असून विदर्भाला प्रदेशाध्यक्ष मिळावं ही मागणीही पूर्ण झाली आहे. परंतु आता विधानसभा अध्यक्षपदी कोणाची नेमणूक होणार हे पाहणंही गरजेचे आहे, कारण काँग्रेस उपमुख्यमंत्रिपद घेऊन विधानसभा अध्यक्षपदावरील दावा सोडण्यास तयार असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

 

 

 

 

 

 

You might also like