व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय; नाना पटोलेंची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय न दिल्यामुळे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट केंद्र सरकारवरच निशाणा साधला आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांना ओबीसीचे राजकीय आरक्षण देत निवडणूक घेण्यास सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे. यामागे नक्की काही तरी आहे. चार ते पाच दिवसात असा कसा चमत्कार झाला मध्यप्रदेशातील आरक्षण प्रश्नी हे पहावे लागेल. मात्र, महाराष्ट्राबाबत केंद्र सरकार सूडबुद्धीने वागतंय, अशी घणाघाती टीका पटोलेंनी केली आहे.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी थेट केंद्र सरकारला लक्ष केले. यावेळी पटोले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचा आजचा निकाल आम्ही बघितला. ओबीसी समाजावर अत्याचार करण्याची भूमिका केंद्र सरकारकडून केली जात आहे. आणि अशात आरक्षण संपवण्याचा घाट भाजपच्या वतीनेही सुरु आहे. त्याचाहह चमत्कार आहे का? हे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय आदेश दिला आहे त्यावरून सजू शकेल, असे पटोले यांनी म्हंटले.

सुप्रीम कोर्टाने मध्यप्रदेशचा ओबीसी आरक्षणाबाबतचा निकाल राखून ठेवला होता. चार दिवसापूर्वी सांगितले होते. असा कोणता चमत्कार झाला कि कोर्टाने मध्यप्रदेशात ओबीसी आरक्षणासहित निवडणूक घ्याला परवानगी दिली हे कळायला मार्ग नाही. मात्र, दोन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश व महाराष्ट्राबाबत जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता त्यामध्ये काहीच तफावत नव्हती, असेही पटोले यांनी म्हंटले.