“प्रवीण दरेकरांनी आपले आडनाव बदलून दरोडेखोर ठेवावे”; नाना पटोलेंचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते तथा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई येथील फोर्टच्या माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दरेकरांना टोला लगावला आहे. “प्रवीण दरेकर यांनी आता आपले आडनाव बदलावे. त्यांनी दरेकर या ऐवजी आता दरोडेखोर असे आडनाव ठेवावे,” असे पटोले यांनी म्हंटले.

प्रवीण दरेकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली. यावेळी पटोले म्हणाले की, मुंबईतील मुंबै बँकेतील मजूर घोटाळा प्रकरणी आज प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरेकर यांनी निवडणुकीच्यावेळी खोटी माहिती सादर केली आहे. त्यांनी आता एक काम करावे त्यांनी आपले आडनाव बदलावे. दरेकर या आडनावाचे ऐवजी त्यांनी दरोडेखोर असे ठेवावे, असे पटोले यांनी म्हंटले.

दरम्यान दुसरीकडे प्रवीण दरेकर यांनी आज सकाळी प्रतिक्रिया दिली. त्यांनी “माझ्यावर जी कारवाई करण्यात आली आहे ती सूड भावनेने करण्यात आलेली आहे. विविध माध्यमातून गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. मात्र, अशा प्रकारे कोठेही गुन्हा दाखल करण्यात येत नाही. माझ्यावर मुंबै बँक मजूर घोटाळा प्रकरणी करण्यात आलेल्या आरोपांना रीतसर पद्धतीने मी सविस्तर पद्धतीने सांगेन. माझ्यावर करण्यात आलेली कारवाई या मागे काहीतरी षडयंत्रच असल्याचा आरोप यावेळी दरेकर यांनी केला.

Leave a Comment