“भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर अगोदर गडकरींपासून सुरु करा,”; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून केंद्र सरकारकडून शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली जात आहे. दरम्यान या मुद्यांवरून आज काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकारला भ्रष्टाचारावरच कारवाई करायची असेल, तर त्यांनी अगोदर गडकरींच्या घरापासून सुरुवात करावी गडकरींच्या कंपन्या नकली होत्या हे सिद्ध झाले होते, असा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. केला.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मोदी सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्यांवरून टीका केली. यावेळी ते म्हणाले कि, “संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याआधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झाले होते. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे.

मात्र, भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असे सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांवरच कारवाई करायचे षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरं तपासली पाहिजे. कारण नोटबंदीच्या काळात कुणाच्या बँक खात्यात जास्त व्यवहार झाले हेही तपासले पाहिजे. स्वतः भ्रष्टाचारी असताना इतरांच्या घरांवर दगड मारण्याचा प्रकार सुरू आहे. संजय राऊत एकटे नाहीत, त्यांच्यासोबत आम्ही देखील आहोत, असेही पटोले यांनी यावेळी म्हंटले.