शिवसेनेची भूमिका म्हणजे आमची भूमिका नाही ; नाना पटोलेंच्या विधानाने सरकारमधील मतभेद उघड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली असली तरी अनेक मुद्द्यावरून त्यांच्यातील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. आता शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केल्याच्या एक दिवसानंतरच महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी सांगितले की शिवसेनेची भूमिका ही आमची भूमिका नाही.

नाना पटोले म्हणाले, “सावित्रीबाई फुले आणि शाहू महाराज यांना भारतरत्न बहाल करण्यात यावा. भारतरत्न प्रदान करणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे, राज्य सरकारची समस्या नाही.”

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –

केंद्र सरकारने सावरकरांना भारतरत्न का दिला नाही असा थेट सवाल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला विचारले होते तसेच भाजपाने आपल्या पूर्वीच्या मित्रपक्षाला हिंदुत्व शिकवू नये असा घणाघात देखील मुख्यमंत्र्यांनी केला होता. सावरकरांना भारतरत्न मिळावे यासाठी केंद्राकडे दोनदा पत्र पाठविले होते. भारतरत्न कोणाला देतात? पंतप्रधान आणि समितीचा हा हक्क आहे,” असे ठाकरे म्हणाले होते.“वीर सावरकरांबद्दल शिवसेनेने कधीही आपली भूमिका बदलली नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment