हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी राजकारण तापलं असून उके यांच्यावरील कारवाई नंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. आमच्याकडेही मसाला तयार आहे. आम्ही भाजपला दणका देणार असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिलाय.
नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हंटल की, भाजप देशात हुकुमशाही आणतंय. भाजप आणि मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर ईडीच्या धाडी सुरु आहेत. पण लोकशाहीत जनता मोठी असते, हे भाजपला कळायला हवं. आता जनताच त्यांना धडा शिकवेल, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशणा साधलाय.
दरम्यान, यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील ईडी कारवाई वरून भाजपवर निशाणा साधला होता. ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. ज्यांच्याविरोधात माहिती दिली जाते, त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. आम्ही देखील काही संदर्भात व्यवस्थित माहिती दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकही कागदपत्रावर आणि पुराव्या वर केंद्रीय तपास यंत्रणाने अद्याप कारवाई केलेली नाही. ईडीचा वापर पाळलेल्या गुंडा सारखा जर कोणी करत असेल तर ते धोकादायक असल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.