थरारक! बांधकाम व्यावसायिकाला भररस्त्यात संपवलं; गोळ्या झाडतानाचे cctv फुटेज पहा (Video)

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आज सकाळी अकरा वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळी झाडून हत्या केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि गाडीतून बाहेर पडलेल्या बियाणींवर दोघा जणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यावेळी दुचाकीवर आलेल्या आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या होत्या. भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा हल्ला नेमका कोणी आणि कोणत्या कारणामुळे करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत.

काय आहे प्रकरण?
नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात बियाणी आणि त्यांचा चालक गंभीर जखमी झाले होते. या दोघांवर नांदेडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र उपचारादरम्यानच संजय बियाणी यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या चालकावर अजून उपचार सुरू आहेत. संजय बियाणी हे नांदेडमधले बडे प्रस्थ असून खंडणीची वसुली किंवा व्यावसायिक स्पर्धेतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

कुख्यात गुंडाची खंडणीसाठी धमकी
नांदेडमधील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांना तीन वर्षांपूर्वी कुख्यात गुंड रिंदा याने खंडणी वसुलीसाठी धमकी दिली होती. त्यानंतर संजय बियाणी यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मात्र तीन महिन्यांपूर्वीच 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती. त्यामध्ये संजय बियाणी यांचा समावेश होता.

Leave a Comment