बाईक टर्न घेताना भरधाव बसची बाईकला धडक, गरोदर महिलेचा जागीच मृत्यू

नांदेड : हॅलो महाराष्ट्र – नांदेडमध्ये एक भीषण अपघात घडला आहे. यामध्ये एका बाईकला खासगी भरधाव बसने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात गरोदर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या महिलेच्या संपूर्ण शरीरावरुन बस गेल्याने या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दुचाकी रस्ता ओलांडत असताना हा भयंकर अपघात घडला आहे. हि संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातात गरोदर महिलेच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत. या अपघातात दुचाकीवरील कुणीही हेल्मेट घातलेलं नव्हतं. शिवाय एकावेळी तिघे जण दुचाकीवरुन चालले होते. यामध्ये दोन पुरुष आणि एका अगोदर महिलेचा समावेश होता. या अपघातात हि गरोदर महिला जागीच ठार झाली असून बाकी दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच प्रवाशी बस ताब्यात घेण्यात आली आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोणत्या ठिकाणी घडला अपघात ?
नांदेडहून त्रिकुटकडे जाणाऱ्या दुचाकीला खाजगी बसने धडक दिली. यात एक 22 वर्षीय गरोदर महिलेला बसचे चिरडलं आणि त्यात या महिलेच्या चिंधड्या उडाल्यात. बावीस वर्षांची गरोदर महिला जागीच ठार झाली तर अन्य दोनजण जखमी झाले. बसने धडक दिल्यानंतर तिघेजण रस्त्यावर फरफटत गेले होते. तर धडक दिल्याचं लक्षात आल्यानंतर बसचा वेग कमी झाला आणि चालकानं पुढे जाऊन बस थांबवली. पण तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता.

घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
हा संपूर्ण अपघात त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंगळवारी दुपारी नांदेड शहराजवळील माळटेकडी पेट्रोल पंपासमोर हा अपघात घडला. शिवाजी डांगे व त्यांची पत्नी तसेच चंद्रकांत मोरे असे तिघे मिळून एका दुचाकीवरून जात होते.पेट्रोल पंपाजवळ दुचाकी रस्ता ओलांडत होती. नेमक्या त्याच वेळी भरधाव वेगानं येत असलेल्या खाजगी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील गरोदर महिला जागीच ठार झाली तर बाकी दोघे गंभीर जखमी झाले आहेत.