औरंगाबाद – मध्य रेल्वेतील ठाणे आणि दिवा रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आल्याने, काही रेल्वे रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई सीएसएमटी आदिलाबाद नंदिग्राम एक्सप्रेस ही काल रद्द करण्यात आली होती.
यामुळे आज आदिलाबाद ते मुंबई सीएसएमटी नंदिग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने एका परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
मुंबईला जाण्यासाठी महत्त्वाची रेल्वे असलेली नंदिग्राम एक्सप्रेस अचानक रद्द केल्याने, हजारो प्रवाशांची गैरसोय झाली असून अनेकांसमोर आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.