Saturday, June 3, 2023

फडणवीसांनी स्वतःला ओएसडी तर सोमय्यांना प्रवक्ता म्हणून नेमावे; मलिकांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार असे ट्विट केल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आता पुन्हा एकदा ट्विट करत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वर गंभीर आरोप केला आहे. फडणवीस यांनी स्वत:ला तपासयंत्रणांचा ओएसडी म्हणून नियुक्त केले पाहिजे तर किरीट सोमय्या याना प्रवक्ता म्हणून नेमावे असे त्यांनी म्हंटल.

नवाब मलिक यांनी फडणवीसांचे नाव न घेता म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय एजन्सींना माझ्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात खूप रस दाखवत आहेत. मी असं सुचवतो की त्यांनी स्वत:ची नियुक्ती ओएसडी म्हणून करावी. त्यांना मुख्यमंत्री म्हणून अशा नियुक्ती करण्याचा भरपूर अनुभव आहे आणि किरीट सोमय्या प्रवक्ता म्हणून नियुक्ती करावी, असं मलिकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी काल एक ट्विट करत म्हंटल होत की, ऑफिशल पाहुणे आज सकाळी माझ्या घरी अचानक येणार आहे. या पाहुण्यांचं मी चहा बिस्कीट देऊन मोठ्या मनाने आदरातिथ्य करेन. त्यांना योग्य पत्ता हवा असेल तर मला फोन करावा असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं.